मद्यप्राशन करून झन्नामन्ना खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

सावदा प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मस्कावद ते वाघोदा रस्त्यावरील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दारू पिऊन झन्नामन्ना खेळणाऱ्यांचा डाव शनिवारी रात्री सावदा पोलिसांनी उधळला. कारवाईत दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी सात जणांवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील मस्कावद ते वाघोदा रस्त्यावर नितीन रामलाल भोगे रा. मस्कावद यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण गावठी दारू पिऊन झन्नामन्ना खेळत असल्याची माहिती सावदा पोलिसांनी मिळाली. त्यानुसार सावदा पोलिसांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता जुगार अड्डयावर धाड टाकून सात जणांवर कारवाई केली तर त्यांच्या ताब्यातील २० हजार रूपये रोख, २६ हजार ५०० रूपये किंमतीचे मोबाईल, १ लाख ५७ हजाराच्या मोटारसायकली, व २ हजार ८०० रूपये किंमतीची दारू असा एकुण दोन लाख ६ हजार ४६० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

यांच्यावर केली कारवाई
याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी धनराज शांताराम तायडे (वय-४०), दिपक पांडूरंग तायडे (वय-४२), महेंद्र हरी पाटील (वय-४४), उमेश यशवंत चौधरी (वय-३९), प्रशांत एकनाथ पाटील (वय ४५), प्रदीप भास्कर पाटील (वय ४१), किशोर तुकाराम चौधरी (वय ५४) सर्व रा. मस्कावद बु ॥ ता. रावेर यांच्यावर सावद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास रिजवान पिंजारी करीत आहे.

Protected Content