बिलाल चौकात दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तांबापुरा परिसरातील बिलाल चौकात वेगवेगळ्या कारणावरून दोन गटात शनिवारी रात्री हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसात दिलेल्या पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नईम उर्फ कल्लु खलील खाटीक (वय-३७) रा. बिस्मिल्ला चौक, तांबापुरा याने जुनेद शेख युनुस यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसात दाखल केलेली केस मागे न घेतल्याच्या रागातून जुनेद शेख युनुस, रफिक शेख अमीर नेपाली, अमीर नेपाली, साबेराबी शेख अमिर (जुनेदची आई), इशरद बी(जुनेदची बहिण), साजेदाबी (जुनेदची मावशी) सर्व रा. बिलाल चौक यांनी शनिवारी ३० मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास चाकू व लाकडी दांडूके घेवून नईमला मारहाण केली तर घरात घुसून घरातील सामान फेकून दिला. तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी शेख जुनेद शेख युनुस (वय-२१) रा. बिलाल चौक हा पॅरोल सुट्टीवर घरी आला होता. संशयित आरोपी शेखु जुनेद हा पॅरोल वर कसा सुटला यांचा राग आल्याने कल्लु खाटील, फिरोज खाटीक, शाहरूख खाटीक, सलीम खाटील (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. तांबापुरा बिलाल चौक जळगाव यांनी शेख जुनेद याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली तर कल्लु खाटीकने जुनेदच्या डोक्यावर पाईप मारून दुखापत केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.ना. नितीन पाटील करीत आहे.

Protected Content