Home आरोग्य सावदा येथील मृत रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

सावदा येथील मृत रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

0
43

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । सावदा शहरात आज एका मयत रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून याला मुख्याधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे.

सावदा येथील दोन रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले आहेत. यात बुधवारा परिसरातील मृत व्यक्तीच्या चाचणीचा समावेश आहे. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर संबंधीत रूग्णाच्या रहिवासाचा परिसर असणार्‍या भागात फवारणी करण्यात आली असून हा भाग सील करण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. तर आधीपासून उपचार घेत असलेल्या रूग्णाचा रिपोर्ट पुन्हा एकदा पॉझिटीव्ह आलेला आहे. यामुळे आता शहरातील एकूण पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या १७ झाली असून यातील सहा जण मयत झालेले आहेत. तर उर्वरित ११ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे.


Protected Content

Play sound