Browsing Tag

savda

खिरोदा येथून गावठी कट्टा व जीवंत काडतुसांसह दोघे अटकेत

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या खिरोदा येथे आयजी नाशिक यांचे पथक आणि सावदा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसांसह दोघांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आमोदा-भीकनगाव महामार्गाला स्व. हरीभाऊ जावळे यांचे नाव !

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | पालमार्गे जाणार्‍या आमोदा ते भीकनगाव (मध्यप्रदेश) या महामार्गाला दिवंगत खासदार, आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. हरीभाऊ जावळे यांचे नाव देण्याचा ठराव येथील नगरपालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत एकमताने…

जय हो : सावदेकर अतुल राणे बनले ब्राम्होस मिसाईल प्रकल्पाचे प्रमुख !

सावदा, ता. रावेर, जितेंद्र कुलकर्णी | येथील मूळ रहिवासी असणारे अतुल दिनकर राणे यांच्याकडे ब्रम्होस एयरस्पेसचे डायरेक्टर जनरल या पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. या माध्यमातून ब्रम्होस सुपरसॉनिक मिसाईल प्रोग्रॅमचे ते प्रमुख बनले असून ही…

अरूण पाटलांना शिक्षा तर संजय सावकारेंना सुरक्षा ! : रावेरच्या निकालाचा राजकीय राडा

सावदा, ता. रावेर, प्रतिनिधी | रावेर विकासो मतदारसंघातून माजी आमदार अरूण पाटील यांच्या पराभवामुळे राजकीय व सहकारच नव्हे तर सामाजिक वातावरणही ढवळून निघाले आहे. भाजपशी जवळीकीची अरूण पाटलांना शिक्षा झाली असेल तर खुद्द भाजपचेच आमदार संजय सावकारे…

मुक्ताईनगर गेले, बोदवड गेले, आता उरले सावदा…! तगडी फाईट निर्णायक वळणावर

मुक्ताईनगर/बोदवड/सावदा : पंकज कपले-सुरेश कोळी-जितेंद्र कुलकर्णी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक असणार्‍या बोदवडच्या नगराध्यक्षा आणि सर्व सहकार्‍यांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांना जोरदार…

बिग ब्रेकींग : पीक विमा प्रकरणी बँकेच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी फळ पीक विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या बँकांवर गुन्हे दाखल केल्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. या अनुषंगाने आज सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर हजेरी; भाजपच्या नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांना नोटीसा

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर हजेरी लावल्याने येथील भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आणि नऊ नगरसेवकांना भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

केळी व्यापारी व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमधील वाद संपुष्टात

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | येथील केळी व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतुकीच्या दराच्या वादावर आज बैठक होऊन तोडगा काढण्यात आला.

बनावट पावत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | रावेर बाजार समितीच्या बनावट पावत्या छापल्या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात रात्री दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहकार खात्याच्या छाप्यांनंतर आता कारवाईकडे लक्ष !

जळगाव प्रतिनिधी | सहकार खात्यातर्फे पोलीस बंदोबस्तात अवैध सावकारांच्या घरावर छापे टाकल्यानंतर या पथकाला अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या असून आता या प्रकरणी काय कारवाई होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावद्यात भाजपला धक्का : नगराध्यक्षांसह बहुसंख्य नगरसेवक राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर !

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी | येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत भाजपच्या नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह सर्व नगरसेवकांनी हजेरी लावल्याने येथे पक्षाला धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत खडसे समर्थक सहभागी होणार का ? : सावदेकरांचे लागले लक्ष !

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी | येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत एकनाथराव खडसे समर्थक सहभागी होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर रवींद्रभैय्या पाटील व…

सावद्यातील हॉटेल मनालीमध्ये चोरी; चोरट्यांनी लांबविली दारू आणि बीयर !

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | येथील हॉटेल मनाली परमीटरूम आणि बीअरबारमध्ये रात्री चोरट्यांनी डल्ला मारून पूर्ण दारू व बियरचे बॉक्सेस आणि बाटल्या चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

जीर्ण विद्युत तारा बदलून द्या : राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची मागणी

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | शहरातील ख्वाजानगरसह परिसरातील जीर्ण झालेल्या विद्युत तारा बदलून मिळाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते फिरोजखान पठाण यांनी वीज वितरण कंपनीकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला महिलेची मारहाण

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महिला वायरमनला एका स्त्रीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावद्याचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र बेंडाळे अपघातात जखमी

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | मागून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत येथील माजी उपनगराध्यक्ष रवींद्र बेंडाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लाचखोरीची व्हायरल क्लिप भोवली; सावद्याच्या मंडल अधिकार्‍याचे निलंबन

जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात पैसे घेतांनाची क्लिप गाजल्यामुळे चर्चेत आलेले सावदा ता. रावेर येथील मंडल अधिकारी बी.एम. पवार यांना निलंबीत करण्यात आले आहे.
error: Content is protected !!