उपबाजार समितीतील वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा येथील कृषी उपन्न बाजार समितीच्या उपबाजारात करण्यात आलेल्या वृक्षतोड प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून तपास करण्याची मागणी कृषी उपन्न बाजार समिती संचालकांनी सचिव गोपाळ महाजन यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या बाबत माहिती अशी की दि ७ रोजी सावदा सबयार्ड कृषी उपन्न बाजार समिती मध्ये अनअधीकृत पण वृक्षतोड करण्यात आले.वृक्षतोड करण्याची कोणत्याही प्रकारची परवानगी व अधिकार नसतांना वृक्षतोड करून परस्पर विक्री करण्याचा प्रकार उघडकिस आल्यावर संबधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करून पोलिसांद्वारे तपास करण्याची मागणी कृषी उपन्न बाजार समिती संचालक मंदार पाटील,सिकंदर तडवी व सौ सविता पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात आज बाजार समिती संचालकांना निवेदन सादर करण्यात आले असून याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Protected Content