जलसंधारणातील कामगिरी बद्दल बाबूशेठ यांचा उद्या सत्कार

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील हाजी शब्बीर हुसेन अख्तर हुसेन उर्फ बाबूशेठ यांनी जल संधारणात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा उद्या आयोजीत कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

उद्या अर्थात १ ऑगस्ट रोजी स्व. पंकज रमेश महाजन स्मृती कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या वतीने आयोजीत करण्यात आलेला हा कार्यक्रम मंगळवारी सकाळी दहा वाजता धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमात केळीच्या धाग्यापासून विविध पदार्थांची निर्मिती करणारे यावल तालुक्यातील सातोद येथील रहिवासी चेतन यशवंत झोपे तसेच चिनावल येथील रोपवाटिका व्यावसायिक विशाल सुरेश घोलाणे यांना कृषी साधना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. तर याच कार्यक्रमात सावदा येथील ख्यातनाम व्यावसायिक तथा समाजसेवक हाजी शब्बीर हुसेन अख्तर हुसेन उर्फ बाबूशेठ यांना त्यांनी पाणी अडवा-पाणी जिरवा या अंतर्गत केलेल्या कामांसाठी विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीषदादा चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील अभिनव फार्मर्स क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर बोडके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. परिसरातील नागरिकांनी याला उपस्थित राहण्याचे आवाहन पाल येथील सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटील व कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख महेश महाजन यांनी केले आहे.

Protected Content