यूरीया’ची साठेबाजांनी निर्माण केली कृत्रिम टंचाई : माजी मंत्री खडसे यांचा आरोप

रावेर, प्रतिनिधी । यूरीया’ची कुठेच टंचाई नसुन ही तर साठेबाजांनी निर्माण केलेली कृत्रिम टंचाई आहे. यूरीया सर्व शेतक-यांना मिळायला हवा जर मिळत नसेल तर मी कृषीमंत्री दादासाहेब भूसे यांच्याशी बोलणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात या आधी यूरीयासाठी चाळीसगावला लाठीचार्ज करावा लागला होता तर शिरपुर येथे गोळीबार करावा लागला होता. माझ सरकार आल्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात मी कृषीमंत्री असतांना यूरीया’चा २६६ रुपये निश्चित केला व तेव्हापासुन आज सुध्दा तोच भाव कायम आहे. आज सुध्दा यूरीया रासायनिक खतांची कुठेच टंचाई नसुन साठेबाजांनी निर्माण केलेली कृत्रिम टंचाई आहे. आताचे सरकार या साठेबाजांवर कारवाई करण्यासाठी अकार्यक्षम असून लोकप्रतिनिधी सुध्दा शेतकर-यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नसल्याने सर्वसाधारण शेतकर-यांचे हाल होत असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले

Protected Content