भुसावळमधून अपक्ष निवडणूक लढवणारच ; सतीश घुले यांच्या भूमिकेने रंगत वाढली

satish ghule

भुसावळ (प्रतिनिधी) आपण प्रचारात आता फार पुढे निघून गेले आहोत. त्यामुळे  माजी आमदार संतोष चौधरी यांनी घेतलेला निर्णय मान्य न करता मी भुसावळमधून अपक्ष निवडणूक लढवविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती, अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनी थोड्याच वेळापूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परीषदेत दिली आहे.

 

अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनी आज रात्री त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये माजी आमदार चौधरींबद्दल आपल्याला आदर असल्याचे सांगितले. परंतू प्रचारात आता खूप पुढे निघून गेलो आहे. त्यामुळे आता माघार शक्य नाही. आपण भुसावळमधून अपक्ष निवडणूक लढवविण्याच्या निर्णयावर ठाम आहोत, असे देखील श्री. घुले यांनी सांगितले. दरम्यान, माजी आमदार चौधरींनी राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश घुले असणार असल्याची घोषणा केली होती. मात्र तिकीट वाटपात जागा राष्ट्रवादीतील मित्र पक्ष पीआरपीला गेल्यामुळे राजकीय गणितं बदलली. चौधरींनी आज डॉ.मधू राजेश मानवतकर यांना आपला व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अपक्ष उमेदवार घुले यांनी बाहेर पडत प्रसिद्धी माध्यमांपुढे आपली भूमिका मांडत निवडणूक लढवणारच,असल्याचे सांगितले. सतीश घुले यांच्या भूमिकेने भुसावळ विधानसभा मतदार संघातील रंगत वाढली आहे.

Protected Content