चोपडा येथे रविवारी भाऊ कदम यांचा कार्यक्रम

WhatsApp Image 2019 11 29 at 17.50.44

चोपडा, प्रतिनिधी | पंढरपूर येथील पालवी संस्थेतील एड्स व एचआयव्हीग्रस्त मुलांच्या मदतीसाठी किमया प्रकाशन व जलसंधारण समितीतर्फे सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम यांचा फुबाईफू, चला हवा येऊ द्या कार्यक्रम चोपडा येथे जागतिक एड्स दिनानिमित्ताने दि.१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आर.डी. पाटील व सागर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंढरपूर येथील पालवी संस्थेतील एड्स व एचआयव्हीग्रस्त मुलांच्या मदतीसाठी किमया प्रकाशन व जलसंधारण समितीतर्फे भाऊ कदम यांचा फुबाईफू, चला हवा येऊ द्या कार्यक्रम चोपडा येथे दि.१ डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे कार्यकर्ते डॉ.नरेंद्र शिरसाट, रमेश एकनाथ शिंदे, मधुकर विठ्ठल बाविस्कर, विश्वासराव नामदेवराव बोरसे ,नरेंद्र पितांबर बाविस्कर, एस.एच.पाटील, डॉ. सुधीर चौधरी, रामचंद्र भालेराव, रमेश ओंकार विसपूते, आर. एन. पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आला.

Protected Content