सावदा येथील मुख्याधिकारीपदी हर्षल सोनवणे

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी हर्षल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत.

सावदा येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची बदली झाल्यामुळे येथील मुख्याधिकारीपद हे रिक्त होते. या अनुषंगाने आज या पदावर हर्षल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी येथून त्यांची सावदा येथे बदली करण्यात आली आहे.

हर्षल सोनवणे हे लवकरच सावदा नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.

Protected Content