महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमिवर उसळला भीमसागर !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनामित्त आज दादर येथील चैत्यभूमिवर आंबेडकर समाजाचा जनसमुदाय मोठ्या प्रमाणावर वंदन करण्यासाठी दाखल झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर जनसागर उसळला आहे. तर विविध मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांना वंदन केले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. ’भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते होते. त्यांनी कायमच समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या चांगल्यासाठी जीवन समर्पिक केलं. आज, त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो’, असं पंतप्रधानांनी म्हटलं.

यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. तर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

Protected Content