एपीआय विशाल पाटलांनी स्वीकारली सावदा पोलीस स्थानकाची सुत्रे !

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पोलीस स्थानकाची सूत्रे आज सहायक पोलीस निरिक्षक विशाल पाटील यांनी स्वीकारली आहेत.

सावदा पोलीस स्थानकाचे एपीआय जालींदर पळे यांची अलीकडेच बदली झाली होती. यामुळे त्यांच्या जागेवर नेमकी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या अनुषंगाने पळे यांच्या जागेवर एपीआय विशाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

सावदा पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणार्‍या क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी एपीआय विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे पोलीस कर्मचारी हे प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, आज सावदा पोलीस स्थानकाचा कार्यभार स्वीकारताच एपीआय विशाल पाटील यांचा समाजाच्या सर्व स्तरांमधून स्वागत करण्यात आले.

Protected Content