नुकसानग्रस्त भागांसाठी मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आदेश

सावदा ता. रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गेल्या काही दिवसात शहरात झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त भागांची तात्काळ पाहणीसह पंचनामे करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आदेश आ. शिरीष चौधरी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

गेल्या काही दिवसांत रावेर यावल मतदार संघात झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.अनेक शेतकऱ्यांचे केळीचे मळे उन्मळून पडले आहेत. यामुळे प्रंचड आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी कोलमडून पडण्याची शक्यता आहे. नुकसांग्रस्त भागाची पाहणी करून त्वरीत पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आदेश आमदार शिरीष चौधरी यांनी प्रशासनाला दिलेले आहेत पण त्यावर न थांबता त्यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, कृषी मंत्री ना.दादा भुसे व राज्यमंत्री ना.विश्वजित कदम यांची भेट घेऊन त्यांना झालेल्या नुकसानीची कल्पना दिली व त्वरित शेतकर्यांना मदत उपलब्ध करून देण्याची मागणी व विनंती केली.

 

Protected Content