मागील भांडणाच्या कारणावरून एकाला मारहाण; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शाहू नगरात मागील भांडण्याच्या कारणावरून तरूणाला लोखंडी पट्टीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना समोर आले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख अकील शेख अकबर (वय-३७) रा. मदिना किरणा जवळ, शाहु नगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मिस्तरी काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी १४ जून रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शेख अकील हा पायी फिरत असतांना  मागील भांडणाच्या कारणावरून उस्मानिय पार्क येथील राहणारा अजूरद्दीन शेख सलीम हा अचानक मागून येवून हातातील लोखंडी पट्टीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. यात शेख अकील याच्या हाताला दुखापत झाली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत शेख अकील शेख अकबर याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजुरद्दीन शेख सलीम याच्या विरोधात बुधवारी १५ जून रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिलीप पाटील करीत आहे.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!