Home Cities जळगाव भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जळगाव भाजप कार्यालयात आदरांजली; जननायकाच्या...

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जळगाव भाजप कार्यालयात आदरांजली; जननायकाच्या स्मृतींना उजाळा

0
7

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  आदिवासी समाजाचे आराध्य दैवत, महान क्रांतिकारी आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती जळगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात (जी.एम. फाउंडेशन) अत्यंत उत्साहात आणि आदरांजली वाहून साजरी करण्यात आली. रविवार, १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करत उपस्थितांनी त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे , भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते हा दीपप्रज्वलन व प्रतिमेचे पूजन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवन कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी दिलेला लढा नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहिल, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.

या जयंती सोहळ्यास पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने माजी अध्यक्षा उज्वला बेंडाळे, एसटी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक कोळी, संतोष इंगळे, उदयजी भालेराव, दीपक परदेशी, पितांबर भावसार, महेश चौधरी, नगरसेविका वैशाली पाटील, सागर पाटील, प्रमोद वाणी, चेतन शर्मा, खंबायत यांच्यासह एसटी मोर्चाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महापुरुषांच्या विचारांचा व कार्याचा वसा पुढे चालविण्याचा संकल्प यादरम्यान करण्यात आला.

Protected Content

Play sound