राज्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून पश्चिम महाराष्टातील सांगली  जिल्ह्यांत गुरुवार पासून मान्सून पूर्व पावसाची संततधार सुरू आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातल्या दुष्काळी भागातही मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जत तालुक्यातील दुष्काळी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. पाऊस पडला आहे. या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी नदी नाल्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. तर ओढे-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. जत तालुक्यात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गुड्डापुर मंदिर परिसर पावसामुळे जलमय झाला आहे.

गुरुवार दुपारपासून पावसाची संततधार
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या जत तालुक्यात गुरुवार दुपारनंतर सुमारे बारा तासापासून मान्सूनपूर्व दमदार असा पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस सुरु असून गेल्या आठ ते दहा वर्षात असा मोठ्या प्रमाणात मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाची रिपरिप सुरूच आहे. संततधार सुरु असलेल्या या पावसाने कोकण परिसराची अनुभूती जत तालुकावासीयांना येत आहे.

सांगली जिल्ह्यातील नेहमी दुष्काळी असलेल्या जत तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरूच असून बहुतांशी ओढे, नाले तुडूंब भरून वाहत असून काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ते बंद झाले आहेत. सांगली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी बऱ्याच ठिकाणी उन्हाळी रब्बी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान या पावसामुळे झाले असल्याचेही दिसून येत आहे.

Protected Content