रस्त्यालगत उभा असणारा तरुण दुचाकीच्या धडकेत जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पेट्रोल संपल्याने दुचाकी रस्त्यालगत उभी करुन तिच्याजवळ उभ्या तरुणाला दुसऱ्या एका भरधाव जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याची घटना जळगाव ममुराबाद रोडवरील म्हाळसा देवी मंदिराजवळ घडली. या अपघातप्रकरणी गुरुवार, १९ मे रोजी जळगाव तालुका पोलिसात धडक देणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावातील हाड परिसरात इकबाल शहा उस्मान शहा (वय २८) हा तरुण राहतो. १६ मे रोजी दुचाकी दोन वाजता इकबाल हा त्याच्या एम.एच.१९ डी.टी. ०३७० या क्रमाकांची दुचाकी घेवून जळगावहून ममुराबादकडे येत होता. ममुराबाद रोडवर म्हाळसा देवी मंदिराजवळ दुचाकीचे पेट्रोल संपले. त्यामुळे रस्त्यालगत मंदिरासमोर दुचाकी उभी करुन तिच्याजवळ इकबाल उभा होता. याचदरम्यान भरधाव वेगाने जात असलेल्या एम.एच.१९ बी.आर. ८६७० या क्रमाकांच्या दुचाकीने इकबाल यास जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरुन पळून गेला. या घटनेत इकबाल यात दोन्ही हात फ्रक्चर झाले असून त्याच्या तक्रारीवरुन धडक देणाऱ्या दुचाकीस्वार सलमान समद पटेल (रा.ममुराबाद ता.जळगाव) याच्याविरोधात गुरुवारी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे हे करीत आहेत.

 

Protected Content