Home क्राईम फैजपुरात २३ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई

फैजपुरात २३ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई

0
59

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी। लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण रस्त्यांवरून फिरणार्‍या २३ दुचाकीस्वारांवर आज प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

शहरासह राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचार बंदीचे आदेश आहे. नागरिक विनाकारण दुचाकीवर बाहेर फिरत असतात अशा नागरिकांवर आज सोमवारी संध्याकाळी सुभाष चौक येथे २३ दुचाकींवर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले व एपीआय प्रकाश वानखडे यांनी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत ४६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना हा गंभीर आजाराला नागरिक जुमानत नाही. संचारबंदी असून सुद्धा कायद्याला न जुमानता बिनधास्त पणे गावात फिरत आहे. कोरोना आपल्याला होणार नाही व कायद्याला आपण घाबरत असे भ्रमात राहून विनाकारण बाहेर पडत आहेत. अशा वाहनांवर संध्याकाळी ५ ते ८ वाजे पर्यंत सुभाष चौकात २३ दुचाकींवर कारवाई करून ४६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या झालेल्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आता जे विनाकारण नागरिक घराबाहेर पडतील आशा नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
यावेळी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, एपीआय प्रकाश वानखडे, पो कॉ बाळू भाई, अमजद पठाण, गुलबक्ष तडवी ,मोहन लोखंडे, विजय पाचपोळ, शेख इकबाल,प्रांत कार्यालयातील उमेश तळेकर व योगेश केदारे उपस्थित होते.


Protected Content

Play sound