Breaking : जळगावात तिघींचा संशयास्पद मृत्यू : कोरोनाची चाचणी होणार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दोन महिलांसह एका बालिकेचा श्‍वसन विकारामुळे मृत्यू झाला असून त्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका बालिकेची अचानक प्रकृती बिघडल्याने तिला दुपारी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा सायंकाळी साडेचार वाजता मृत्यू झाला. बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण समोर यावे म्हणून तिची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तिची प्राथमिक लक्षणे ही कोरोना प्रमाणे असल्याने जिल्हा रूग्णालयातर्फे तिची चाचणी करण्यात येणार आहे. तर तिच्या मृतदेहावर अतिशय काळजीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.

यासोबत शहरातील एका साठ वर्षे वय असलेल्या महिलेचा सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला. या महिलेला श्‍वास घेण्यास अडचण येत असल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर आधीपासूनच रूग्णालयात दाखल असणार्‍या ४५ वर्षाच्या तिसर्‍या महिलेचाही सायंकाळी मृत्यू झाला. वैद्यकीय रूग्णालयाने या तिन्ही मृतांचे नमुने धुळे येथील प्रयोगशाळेत रवाना केले असून येथून आलेल्या रिपोर्टकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, हे तिन्ही रूग्ण फक्त संशयित असून त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला की नाही हे चाचणीच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content