महावितरण कंपनीचा मनमानी कारभार

mahavitarn

यावल प्रतिनिधी । येथील महावितरण कंपनीच्या माध्यमातुन शासनाचे आदेश तसेच कोणतेही निर्णय नसतांना वेगवान गतीने धावणारे वीजमीटर लावण्यात येत आहे. त्यातच, मीटर बदलण्याची ही योजना तात्काळ न थांबविल्यास शिवसेनाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, शहरात गेल्या काही दिवसापासून महावितरण कंपनीच्या वतीने सध्या आर.मा.पी.डी.आर.पी.टाऊनमध्ये आर.एफ.मीटरच्या नावाखाली अतिशय वेगवान चालणारे मीटर बसविण्याचे काम महावितरण कंपनी करत आहे. शासनाचे आदेश नसतांना मीटर बदलण्याचे मनमानी कारभार महावितरण कंपनीच्या माध्यमातून होत आहे. शहरातील ग्राहकांकडे सध्या लावण्यात आलेल्या मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड अथवा मीटरमध्ये नादुरुस्ती नसतांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून मीटर बदलण्याचा अट्टाहास का केला जात आहे ? असा प्रश्न शहरातील नागरिकांसमोर पडला आहे. तसेच ग्राहकांच्या बीलमध्ये मोठी तफावत दिसुन येत आहे. ग्राहकांकडून अव्वा की सव्वा अशी बिल देवुन सर्व-सामान्य वीजधारक ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुट करण्याचा कार्यक्रम महावितरण कंपनी करीत आहे. दुष्काळाची परिस्थिती उदभवलेली असुन देखील, महावितरण कंपनीने वीजबिल भरण्यासाठी पिळवणुक करीत आहे. महावितरण कंपनीने अशा प्रकारची बे-बंदशाही व दडपशाही शिवसेना कदापी सहन करणार नाही. तरी महावितरण कंपनीने तात्काळ मीटर बदलण्याचा अनाधिकृत योजनेचा व अव्वा की सव्वा वीजबिल ग्राहकांना पाठविण्याचा भोंगळ व मनमानी कारभार बंद न केल्यास यावल तालुकातील शिवसेनाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महावितरणचे उप कार्यकारी अभियंता दिलीप उत्तम मराठे, व ए.बी. दमाले यांना निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. या निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, दिपक बेहडे, शहर शिवसेना प्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेना आदीवासी सेलचे तालुकाधक्ष हुसैन तडवी, सागर देवांग, विजय पंडीत, योगेश पाटील, सागर बोरसे, सचिन कोळी ,पिंटू कुंभार आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Protected Content