भविष्यातही ‘आर.एस.एस.’चा नव्हे तर तिरंगाच राष्ट्रीय ध्वज – गिरीश महाजन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “भाजपाचं सरकार हे आर.एस.एस.च्या विचारधारेवर चालणारं सरकार आहे. पण भविष्यात तिरंगाच देशाचा राष्ट्रीय ध्वज राहील असे म्हणत आर.एस.एस.चा झेंड्याला राष्ट्रीय ध्वज होण्यास माझे समर्थन नाही.” असं विधान गिरीश महाजन यांनी केलं.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘लाभार्थी संवाद कार्यक्रमा’चं आयोजन शहरातील जिल्हा नियोजन भवनात करण्यात आलं होतं. याप्रंसंगी माजी मंत्री, आ.गिरीश महाजन यांच्याशी ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ने अनेक विषयावर संवाद साधला. यावेळी आर.एस.एस.च्या झेंड्याला राष्ट्रीय ध्वज करण्याची मागणी वा कोणी केलेल्या विधानासंदर्भात मी कधी काही ऐकलं नसून भविष्यातदेखील तिरंगा झेंडा कायम राष्ट्रीय ध्वज राहील. असे यावेळी सांगितलं.

“राज्यसभेसाठी भाजपाचे तिन्ही उमेदवार आणि आगामी जिल्हा परिषदेत फोर्टी फाईव्ह प्लस उमेदवाराच्या विजयाची खात्री व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी बाहेर येऊन संवाद साधला पाहिजे. राजकारणात खालच्या थराला जाऊन टीका टिप्पणी करण्यात येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत अनेक विषयावर संवाद साधला.

पंतप्रधान यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यातल्या लाभार्थ्यांचे संवाद साधला. या घटनेकडे तुम्ही कसे पाहता ?  असा प्रश्न विचारल्यावर, “सगळ्या योजना केंद्राच्या आहेत असं म्हणत ते चांगला आहे व मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला पाहिजे. मात्र त्यांनी बाहेर येऊन जनतेशी संवाद साधला पाहिजे. अशी अपेक्षा आमदार महाजन यांनी व्यक्त केली.

संजय राऊत यांचा भोंगा सकाळपासून सुरू होतो; मात्र या भोंग्यामध्ये लोकांना आता स्वारस्य राहिलेले नसून शेतकऱ्यांचे, विजेचे राज्यामध्ये अनेक प्रश्न आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात याकडे दुर्लक्ष होत असल्यानं त्याचं उत्तर लोकं येत्या निवडणुकीत देतील.” असे महाजन यांनी सांगितले

आमदारांची जिल्हा परिषद फोर्टी फाईव्ह प्लस जागेची खात्री –

संजय राऊत यांनी “भाजपने डॉ.बोंडे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देऊन आहे निष्ठावंतांना डावलण्यात आलं आहे.” या विधानाकडे आपण कसं पाहता असे विचारल्यावर त्यांनी सांगत शिवसेनेने बाहेरून निवड केलेल्या खासदारांची यादी वाचत “एक बोट समोर केल्यावर चार बोटं आपल्याकडे असतात. हे लक्षात ठेवायला हवं.” असं विधान केलं.

राज्यसभेतील तिन्ही उमेदवार निवडून येईल अशी खात्री व्यक्त केली. राजकारणात खालच्या थराला जाऊन टीका टिप्पणी करण्यात येऊ नये. अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

व्हिडीओ लिंक
https://fb.watch/dlUO8G5sf3/

Protected Content