श्रीराम मंदीर व कामसिध्द महाराज मंदीर विश्वस्त मंडळाची पंचवार्षिक निवड बिनविरोध

सावदा ता. रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रोझोदा, ता. रावेर येथील श्रीराम मंदीर व कामसिध्द महाराज मंदीर विश्वस्त मंडळाची पंचवार्षिक निवड बिनविरोध निवड करण्यात आली.

रोझोदा, ता. रावेर येथील श्रीराम मंदीर व कामसिद्ध महाराज देवस्थानाची वार्षिक सर्व साधारण दि २९ रोजी श्रीराम मंदीरात विश्वस्ताच्या उपस्थीतीत व विजय राघव महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.

यात विषय पत्रिकेनुसार विषय एकमताने मंजुर झाले. याच वेळी मागील विश्वस्त मंडळ कार्यकारणी ५ वर्ष पूर्ण झाल्याने नवीन कार्यकारणी रिक्त मंडळाची निवड नावे सुचवून करण्यात आली. नवीन विश्वस्त मंडळात सर्वश्री आजीव सभासदामधून नाव सुचवून विजय महाजन, रमेश महाजन, रेनुदास फेगडे, बसंत बोंडे, गुणवंत टोंगळे, महेंद्र भारणे, डॉ. मिलोद वायकोळे, विलास बोंडे, नितीन चौधरी, लक्ष्मण धांडे, विमल बाँडे, निमंत्रीत विश्वस्त म्हणून रुपेश ओंकार फेगडे, तसेच पदसिद्ध विश्वस्त म्हणून गावाचे प्रथम नागरिक सरपंच अर्चना बढ़े यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर १५ दिवसाच्या आत घटनेनुसार दि ५-९-२०22 रोजी अध्यक्षः उपाध्यक्ष सचिव यांची निवड निवडून आलेल्या विश्वत्ता मधून करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष – विजय राघव, महाजन, उपाध्यक्ष- रेनुदास यादव फेगडे सचिव- वसंत भगवान बोंडे यांची निवड करण्यात आणि दि २९ च्या वार्षिक सर्व साधारण सभेसाठी आजीवन सभासद नितीन भंगाळे, रविंद्र चौधरी, अरुण बोंडे, दिपक धाँडे, चंद्रकात घोडे. दिनकर पाटील, लक्ष्मण कोढी, दिपक महाजन, नारायण राणे, राजु सरोदे, देविदास, हरीष धांडे, मनोज फेगडे, दिलीप धांडे, पुरुषोत्तम धांडे, शालनी थोडे, मंगला बोडे, सुनिता बोंडे, घाँडे, गणेश चौधरी, डिगंबर बोंडे, गिरीष भारणे, ज्ञानदेव नारखेडे, प्रकाश चौधरी, भास्कर भंगाळे, कैलास वायकोळे, डॉ. पी जे चौधरी, विनायक सोनवणे, शशीकांत महाजन, सिताराम नेमाडे, ज्ञानदेव चौधरी, वृषील फेगडे, लौकीक महाजन, रघुनाथ सरोदे, जयंत कोल्ट, भानुदास भारने हजर होते. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

Protected Content