लेखी आश्‍वासनानंतर सावदा येथील पत्रकारांचे अन्नत्याग आंदोलन मागे !

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बर्‍हाणपूर ते अंकलेश्‍वर महामार्गाच्या दुरूस्तीचे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर येथील पत्रकारांनी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन दुपारी मागे घेण्यात आले.

सावदा प्रतिनिधी येथील बर्‍हाणपूर अंकलेश्वर महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे व सावदा शहरातील दुभाजकासाठी सोडलेल्या जागेत तात्काळ कॉंक्रिटीकरण करण्यात यावे यासाठी ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने दिनांक १७ रोजी अन्नत्याग उपोषण सावदा येथे बस स्थानकासमोर पुकारले होते.

या आंदोलनाला सावदा शहरातून सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे फाउंडेशनच्या पदाधीकार्‍यांनी सांगितल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शाखा अभियंता चंदन गायकवाड व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी व्ही.के. तायडे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु काही एक फायदा झाला नाही.

या अनुषंगाने ळे संध्याकाळी चार वाजता चंदन गायकवाड व विखे तायडे यांनी लेखी स्वरूपात ‘सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशन’ला पत्र दिल्यानंतर उपोषणाची उपोषण सोडवण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, सुरेश परदेशी, पंकज येवले रावेर बाजार समिती संचालक सय्यद अजगर, तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष दिनेश पाटील, मा. उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन, सिद्धेश्वर वाघुळदे , डॉक्टर अतुल सरोदे ,प्रियदर्शनी सरोदे, माजी नगराध्यक्षा हेमांगी चौधरी, नीता पाटील, फिरोज खान पठाण, नंदा लोखंडे, कोचुर येथील उपसरपंच अमोल पाटील, महेश भारंबे,अजय भारंबे यांच्यासह अनेक नागरिकांनी या उपोषणाला पाठिंबा दिला. रावेर यावल तालुका मेडीकल असोसिएशनने देखील या उपोषणाला पाठिंबा दिला होता.

दरम्यान, यावेळी संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शाखा अभियंता चंदन गायकवाड यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे की, दिनांक १५ नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण यावल ते चोरवड पर्यंत खड्डे दाबण्यात येतील व एक फेब्रुवारीपर्यंत डांबरीकरण करण्यात येईल.

तात्काळ कामाला सुरुवात

कोचुर ते साईबाबा मंदिरापर्यंत कॉग्रेटी करण्याचे काम पूर्ण झाले असून रस्त्याच्या मधोमध दुभाजकसाठी जागा सोडण्यात आली होती. या दुभाजकावर अनेक ठिकाणी गाड्या घसरून अपघात होत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता व्ही. के. तायडे यांनी समाज सुचकता दाखवत या दुभाजकासाठी सोडलेल्या जागेवर तात्काळ कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

Protected Content