आशा स्वयंसेविकांचा जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी जळगावात हजारोंच्या संख्येने आशा स्वयंसेविका आज रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळालं.

हजारोंच्या संख्येने अशा स्वयंसेविकांनी जळगाव जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त केला. जळगाव जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको आंदोलन करत हजारांच्या संख्येने आशा स्वयंसेविकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासना सह शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

अनेक वर्षांपासूनच्या आमच्या मागण्या आहेत त्या मान्य व्हाव्यात त्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळावं मागण्या मान्य झाला नाही तर संपूर्ण राज्यभरात ७० हजाराहून अधिक आशा स्वयंसेविका तसेच गटप्रवर्तक या रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचा आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Protected Content