Home क्राईम मोबाईल चोरट्यास एलसीबीकडून अटक

मोबाईल चोरट्यास एलसीबीकडून अटक

0
60

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनिपेठ परिसरातून मोबाइल चोरणार्‍या संशयितालास्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाफर राजू शेख वय  २८ रा. इस्लामपुर, जामनेर  असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, जामनेरात जाफर शेख हा चोरीचा मोबाइल विक्री करण्यासाठी फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाल यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार सुनील दामोदरे, दीपक पाटील , संदीप साबळे , प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर ,ईश्वर पाटील, भारत पाटील यांच्या पथकाने गुरुवारी जामनेर शहरातुन संशयित जाफर शेख याच्या मुसक्या आवळल्या. त्याने शनिपेठ परिसरातून मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सदरचा मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे  पुढील कारवाईसाठी त्याला शनिपेठ पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Protected Content

Play sound