रावेरातील दगडफेक प्रकरणात १४ जणांना अटक; पोलिस अधिक्षकांची घटनास्थळी भेट

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरात काल सायंकाळी श्रीराम भगवान यांच्या शोभायात्रेवर केलेल्या दगडफेक प्रकरणी चौदा आरोपींना अटक करण्यात आली असून घटनास्थळी पोलिस अधीक्षकसह अनेक वरिष्ठ अधिका-यांनी भेटी दिल्या आहे. शहरात शांतता असुन आज सकाळ पासुन रामभक्तांचे नियोजित कार्यक्रम दिवसभर सुरु होते.

काल रात्री श्रीराम यांची शोभायात्रा मिरवणुक जात असतांना काही समाजकंटकांनी जोरदार दगडफेक केली.यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेले महिला व पुरुषांमध्ये एकच धावपळ झाली.केलेल्या दगडफेकित पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटीलसह दोन पोलिस कर्मचारी तसेच दोन नागरीक जखमी झाले होते.या प्रकरणी रात्री उशिरा पोलिस कर्मचारी भरत पाटील यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल झाला.आता पर्यंत दगडफेक प्रकरणात आरोपी शेख तोसिफ शेख, यूसुफ (वय ३५) गयासुद्दीन कलीमोद्दीन (वय३८) दोन्ही रा.कारागिर नगर,शे.शहाबुद्दीन शे.नजीमुद्दीम (वय ३२), शे.दानिश शे.हर्षद (वय १९), शे.अर्शद शेख मुस्ताक (वय४८), शे.अत्ताक शे बिस्मिल्ला (वय२५), शे इरफान शे मुस्ताक (वय ३४), शे.इमरान शे.कालू (वय ३७), शे. अश्फाक शे.इसाक (वय ४५), शे.शहादत शे.मुस्ताक (वय ४१), उमर फारुख शे.अकील (वय२४), शे.शाबीर शे.हमीद (वय ४८), शे.शाकिब शे.रशीद (वय ३५),शे.आबिद शे.वजिर (वय ४५) सर्व राहणार मोमीनवाडा येथील रहीवासी असून यांना अटक करण्यात आली असून अद्याप अनेक संशयित पसार असुन यांचा पोलिस शोध घेत आहे.या गुन्हाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.

घटनास्थळी यांनी दिल्या भेटी

दगडफेक झालेल्या भागात रात्री पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, सह.पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, डॉ. कुणाल सोनवणे, प्रांतधिकारी श्रीमती यादव, तहसीलदार बंडू कापसे, एलसीबी पोलिस निरीक्षक नजन पाटील, पोलिस निरीक्षक गजानन पडघम यांनी भेट दिल्या तर रावेर प्रभारी अधिकारी आशीषकुमार अडसूर, पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले, तुषार पाटील,घनशाम तांबे, दिपाली पाटील यांनी परिस्थिती नियंत्रणात मिळवण्यासाठी परिश्रम घेतले.

दिवसभर सुरु होते रामभक्तांचे कार्यक्रम

रावेर शहरात शोभायात्रेवर काल रात्री झालेल्या दगडफेक नंतर काही मीनीटामध्ये प्रभारी अधिकारी आशीषकुमार अडसुर यांनी व त्यांच्या टीमने परिस्थिती नियंत्रणात मिळवल्याने तसेच नागरीकांच्या मनातील भिती निघाल्याने आज सकाळ पासुन शहरात अयोध्या येथे सुरु असलेल्या श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त शहरात ठिक-ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.अनेक मंदीरांवर विद्युत रोषनाई करण्यात आली होती. शहरात नागरीकांना लाडूचा प्रसाद वाटप करण्यात येत होता. तर काही ठिकाणी फटाके फोडून जल्लोष करत होते.अनेक ठिकाणी श्रीराम यांच्यावर भजन वाजवण्यात येत होते.तर काही मंदीरांमध्ये भंडाराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज सायंकाळी घराबाहेर दिवे लावण्यात येणार असल्याचे रामभक्तां कडून सांगण्यात आले.

Protected Content