पिंपरखेड येथील मारोती मंदिराचे भूमीपूजन संपन्न

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या ५०० वर्षांची प्रतिक्षा संपली श्रीरामजन्मभुमी अयोध्याधाम येथे आज होत असलेल्या श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा निमित्ताने पिंपरखेड येथील मारोती मंदिर येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांतुन मंजुर २५ लक्ष रूपयांचा भव्य सभामंडप बांधकामाचा भुमीपूजन सोहळा जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांचा शुभहस्ते पार पडला.

याप्रसंगी शहर प्रमुख डॉ. मंगेश तांबे, राजुदादा परदेशी, उद्योजक संजय चौधरी, अमृत चौधरी, गोकुळभाऊ महाजन, जगदीशशेठ गुजराथी, सतीष पाटील, विनोद पाटील, मनोज चौधरी, पी.आर.वाणी, विनोद पाटील, राजु पाटील, समाधान मगर, पंकज मराठे, बापु मराठे, भावडु चौधरी, किशोर चौधरी अक्षय राजपुत यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content