पोलीस अधिकाऱ्यांना नेमणूकीच्या ठिकाणी हजर होण्याचे जिल्हा अधिक्षकांचे आदेश

जळगाव प्रतिनिधी । शासनाने पारित केलेल्या पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १६ पोलीस अधिकाऱ्यांना नेमणूकीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी काढले आहे.

जिल्ह्यांतर्गत पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आले आहे. यात जिल्ह्यात येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांना नियुक्तीचे ठिकाण, प्रभारी चार्ज सोडणे आणि जिल्ह्यातून बाहेर जाणारे पोलीस अधिकारी यांनी पदभार सोडण्याचे आदेश नमूद केले आहे.

बदल्या झालेल्या अधिकारीची नावे (कंसात बदलीचे ठिकाण)
पोलीस निरीक्ष धनंजय येरूळे, भडगाव (जळगाव शहर), पो.नि. किसन नजन पाटील, नंदूरबार (पाचोरा), पो.नि.विलास शेंडे, ठाणे शहर (जिल्हा पेठ), पो.नि. सुधिर पाटील, नाशिक (यावल), पो.नि. ज्ञानेश्वर जाधव, धुळे (एरंडोल), पो.नि. अशोक उतेकर, ठाणे शहर (भडगाव), पो.नि. राहुल खताळ, आकोला (पहूर), पो.नि. जयपाल हिरे, लोहमार्ग मुंबई (धरणगाव), पो.नि. राहुल गायकवाड, लोहमार्ग औरंगाबाद (बोदवड), पो.नि. संतोष भंडारे, अमरावती ग्रामीण (नियंत्रण कक्ष, जळगाव), सपोनि गणेश चव्हाण, जळगाव तालुका (नशिराबाद), सपोनि देविदास इंगोले, नाशिक शहर (सावदा), सपोनि पवन देसले, धरणगाव (मेहुणबारे), सपोनि स्वप्निल उनवणे, एरंडोल (निंभोरा), सपोनि संदीप आराक, चोपडा ग्रामीण (शहर वाहतूक शाखा, भुसावळ)

Protected Content