बापरे.. सुकळी परिसरात पट्टेदार वाघाचे पुन्हा दर्शन !

मुक्ताईनगर – पंकज कपले । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी परिसरात पुन्हा एकदा पट्टेदार वाघ दिसून आला आहे. शेतकऱ्याने वाघाचे फोटो मोबाईलमध्ये कैद केले आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगर मागील आठवड्यात तालुक्यातील सुकळी परीसरातील केळी बागेत एक पट्टेदार वाघ विश्रांती घेत असलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना ताजी असतांना मुक्ताईनगरातील  शेतकरी वैभव पाटील हे शनिवार ७ मे रोजी रात्री १० वाजता शेत नांगरतांना शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या लाईटच्या प्रकाशात समोर बांधावर पट्टेदार वाघ दिसून आला. स्वत:जवळच्या मोबाईलमध्ये पाटील यांनी कैद केला. तीन दिवसांपूर्वी शेजारच्या केळीबागेत वाघाने रानडुकराची शिकार केली होती. तसेच गुराख्यासह आणखी दोघांनाच्याही नजरेत वाघ दिसुन आला. यामुळे याच परीसरात वाघाचा मुक्तसंचार असल्याचे सिद्ध होत असून या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. वनविभागाकडुन एक प्रशिक्षित पथक नेमून गस्त घालावी, संवेदनशील भागातील केळीबागेत शेतीकामे करतांना शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी केळी उत्पादक शेतकरी वर्गाची आहे.मात्र वनविभागाच्या वरीष्ठ पातळीवरुन सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

 

देशभरातुन पट्टेदार वाघांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या जळगांव जिल्ह्यातील (वडोदा वनक्षेत्र) आई मुक्ताई-भवानी व्याघ्र अधिवास क्षेत्र. या क्षेत्रात आठ-दहा वाघांचा असलेला मुक्त संचार असल्याने जिल्ह्याच्या वैभवात भर पडली. ही जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब असली तर आजपर्यत या अधिवास क्षेत्राचा अपेक्षित विकास हवा तितका झाला नाही. गेल्या सात महिन्यांपासून वैभवशाली वनक्षेत्र प्रभारी कार्यभारावर तग धरुन आहे. एक अनुभवी कर्तव्यदक्ष अधिकारी यांची नेमणुक सुध्दा वनविभागाकडुन होत नसेल तर इतर व्याघ्रसंवर्धनाविषयी वनविभाग कोसो दुर आहे. या संवेदनशील वनक्षेत्राबाबत काही महिन्यांपूर्वी मंत्रीमंडळाची एक महत्त्वपुर्ण बैठकसुद्धा पार पडली. मात्र विकासाबाबत पुढे काय झालं माहीती नाही. तसेच राजकिय कारकिर्दीत वजनदार मंत्रीपदे लाभलेल्या वाघांच्या जिल्ह्यात वाघ उपेक्षित असुन जंगलात पायाभुत सुविधा नसल्याने शेतीशिवारात भटकावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. दिवसोंदिवस जमिनीतील पाण्याचे उपसाचे प्रमाण वाढल्याने जंगलातील नैसर्गिक पाणीस्रोत ऐन उन्हाळ्यात आटुध कोरडेठाक होताहेत.

 

जंगलातील उन्हाळ्यात असलेला नैसर्गिक थंडावा नामशेष होत असुन उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी मासभक्षी प्राणी केळीबागेत आसरा शोधत भटकत आहे. अवैध वनचराईमुळे तृणभक्षक वन्यप्राणी अन्नपाण्याच्या शोधात शेतीशिवाराची वाट धरताहेत.यास कारणीभुत वाघांचा मुक्त संचार असलेल्या संवेदनशील जंगलात ठोस उपाययोजना नियोजनबध्द व प्रभावीपणे राबविल्या गेल्या नाही.आवश्यक तेवढा विकास करण्यास वनविभाग अपयशी ठरला.

Protected Content