बोदवड पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या गैरहजरीमुळे कामांचा खोळंबा

बोदवड, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पंचायत समिती मधील मनरेगा विभागात अधिकारी हे कार्यलयीन वेळेत हजर राहत नसल्याने लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करून देखील कामकाजात सुधारणा होत नसल्याने लाभार्थ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

 

मनरेगा विभागातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिनेश अंजाळे यांचा मनमानी कारभार चालू असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. दिनेश अंजाळे हे पंचायत समितीमध्ये वेळेवर कार्यालय न येणे, वारंवार कार्यालय सोडून बाहेर जाणे, तसेच लाभार्थ्यांची दिशाभूल, अरेरावीच्या भाषेत बोलणे अशा प्रकारचे कृत्य करीत आहे. तरी सुद्धा संबंधित वरिष्ठ अधिकारी याबाबत लक्ष देण्यास तयार नाही. त्यांच्या वारंवार तोंडी तक्रार आली असून सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून आलेली नाही. तसेच दिनेश अंजाळे हे लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे व दिशाभूल करणारी माहिती नेहमी पुरवत असतात. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी यांची संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी लाभार्थी करीत आहेत. परंतु, अद्यापही याची कोणत्याही प्रकारची चौकशी व दिनेश अंजाळे यांच्यावरती कारवाई केलेली दिसून येत नाही.

शासन आदेशाला केराची टोपली
कामानिमित्त सरकारी कार्यालयात गेल्यावर नागरिकांना बऱ्याचदा या कक्षातून त्या कक्षात फिरावे लागते . अधिकारी जागेवर नसणे, कर्मचारी दुसऱ्याच कक्षात बसणे, हा अनुभव लोकांसाठी नित्यनेमाचा असतो. त्यामुळे नागरिकांचा नाहक त्रास होताना दिसत आहे त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेवरच बसावे,असा महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढलेले आहे तरी सुद्धा बोदवड पंचायत समिती येथील मनरेगा विभाग सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिनेश अंजाळे हे शासन आदेशाला केराची टोपली दाखवितांना दिसून येते आहे.

Protected Content