Home Cities जळगाव धनगर समाज कर्मचारी संघटनेचा विस्तार करण्याचा निर्धार; जिल्हास्तरीय बैठकीत एकजुटीचा संदेश

धनगर समाज कर्मचारी संघटनेचा विस्तार करण्याचा निर्धार; जिल्हास्तरीय बैठकीत एकजुटीचा संदेश

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धनगर समाजातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महिला आणि युवक यांना एकत्र आणून सक्षम व प्रभावी संघटना उभारण्याच्या उद्देशाने धनगर समाज कर्मचारी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक रविवारी जळगाव येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटन विस्तार, समाजहिताचे उपक्रम आणि कर्मचारी वर्गाची भूमिका अधिक प्रभावी करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ आणि कर्मचारी संघटना, जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने निमखेडी शिवारातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी धनगर समाजातील ज्येष्ठ नेते पी. एस. सोनवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक अरविंद देशमुख, सुभाष सोनवणे, प्रभाकर न्हाळदे, प्रमिला कंखरे, डी. बी. पांढरे, रमेश सुलताने, अरुण ठाकरे, सुभाष करे, दिलीप धनगर, विश्वनाथ धनके, रामचंद्र चराटे, धर्मा सोनवणे, पी. के. नायदे, डॉ. संजय पाटील, विकास मनोरे, गणेश बागुल, पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, सुवर्णा धनगर, विनोद सावळे आणि प्रा. विजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्तविक जिल्हाध्यक्ष तुळशीराम तोताराम सोनवणे यांनी केले. बैठकीत यशवंत शिरोळे यांनी “संघटनेची दशा व दिशा” या विषयावर मार्गदर्शन केले. विश्वनाथ धनके, रामचंद्र चराटे, धर्मा सोनवणे आणि पी. के. नायदे यांनीही संघटन बळकटीसंदर्भात आपले विचार मांडले. यावेळी आगामी कार्यकाळासाठी पदाधिकाऱ्यांची निवड, संघटन विस्तार, युवक व महिला कर्मचारी यांचा सहभाग वाढविणे तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी संघटना अधिक सक्षम करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीत भारतीय संरक्षण दलातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले वसिदास सोनवणे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या देशसेवेचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कर्मचारी अध्यक्षा भारती ठाकरे यांनी केले, तर स्वाती पांढरे यांनी आभार मानले. जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल मनोरे, अनिल अहिरे, जी. बी. देशमुख, पांडुरंग पवार, महेंद्र सोनवणे, टी. बी. पांढरे, महेंद्र चौधरी, दत्तात्रय कंखरे, शरद धनगर, संतोष कचरे, राजू कंखरे, प्रवीण पवार, आनंद धनगर, प्रवीण धनगर, अरुण हडपे आणि तापीराम हिवराळे यांनी कामकाज पहिले.


Protected Content

Play sound