चाळीसगाव येथील राष्ट्रीय लोकन्यायालयात ९० प्रकरणांचा निपटारा

चाळीसगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यामानाने चाळीसगाव न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी एकूण ८५९ प्रकरण ठेवण्यात आले होते. त्यापैकी ९० प्रकरणे निकाली काढत ९१ लाख ७७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

 

चाळीसगाव न्यायालयात दिवाणी व फौजदारी न्यायालयात मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांच्या आदेशानुसार चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती व वकिल संघाच्या संयुक्त विद्यामानाने वादपुर्व प्रकरणांच्या कर्ज व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या वसुली करीता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन शनिवार ७ रोजी करण्यात आले. सदरील राष्ट्रीय लोकन्यायालयात दाखल पुर्व ५०४१ इतके प्रकरणे ठेवण्यात आले होते. त्यापैकी ५८२ इतके प्रकरणे निकाली काढण्यात येवुन ४६,११,४०७ रूपयांची वसुली करण्यात आली. त्याचप्रमाणे चाळीसगांव न्यायालयातील एकुण दाखल असलेले दिवाणी व फौजदारी  प्रकरणे ८५९ पैकी  ९०  इतके निकाली काढून ९१ लाख ७७ हजार ७९ रूपयांची वसुली करण्यात आली.

 

सदरील राष्ट्रीय लोकन्यायालयात अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर चाळीसगांव एन. के. वाळके, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ जी. व्ही. गांधे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगांव, फौजदारी न्यायालय क. स्तर चाळीसगांव, ए. एच. शेख, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगांव एम. व्ही. भागवत, अध्यक्ष वकीलसंघ चाळीसगाव ॲड. बी.के.पाटील,  सचिव वकीलसंघ चाळीसगांव ॲड. माधुरी एडके, तसेच पॅनल मेंबर्स ॲड. सुलभा शेळके, ॲड. राहुल वाकलकर, ॲड. प्रियंका पवार, ॲड. दुर्गेश सुर्यवंशी व न्यायालयीन कर्मचारी सहा. अधिक्षक डी.जी.रणधीर,  डी.के. पवार, योगेश चौधरी, डी. टी. कु-हाडे, किशोर पाटील यांनी लोकन्यायालयाचे कामकाज पुर्ण केले. तर लोकन्यायालयाचे कामकाज यशस्वीतेसाठी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, व. स्तर चाळीसगांव  एन. के. वाळके, यांनी म. गटविकास अधिकारी, पंचायत समिती चाळीसगांव, सर्व सहा. अभियोक्ता चाळीसगांव, सर्व बॅंक अधिकारी, नगर पालिका अधिकारी, म.रा.वि.म. अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

 

Protected Content