Home क्राईम अभविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा; मणियार बंधूंची मागणी

अभविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा; मणियार बंधूंची मागणी

0
103

जळगाव प्रतिनिधी । राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या व मागण्यांसाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना धुळे येथे मारहाण करण्याऱ्या पोलीसांना निलंबित करण्याची मागणी आयुष मणियार व पियुष मणियार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यासंबंधीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी नितीन महाजन यांना त्यांनी दिले.

ज्या परीक्षा झाल्याच नाहीत, त्यांचे शैक्षणिक शुल्क परत करावे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या शुल्कात ३० टक्के कपात करावी, सरासरी च्या सुत्रामुळे चुकीच्या निकालाचे विद्यापीठांनी पुर्नमुल्यांकन करावे अशा मागण्यांसाठी अभाविपचे कार्यकर्ते राज्यभर सर्व पालकमंत्र्यांना निवेदने देत असतांना पालकमंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना धुळे येथे अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेबद्दल राज्यभरात निषेध व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound