आत्मनिर्भर भारताचे भविष्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध : महापौर

जळगाव प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी धुळे येथे पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या भेटीसाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी एखाद्या गुंडाप्रमाणे मारहाण केली. आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भवितव्य आहेत. विद्यार्थ्यांना झालेली मारहाण निषेधार्थच असल्याचे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.

महापौरांचे काळी फित लावून कामकाज
धुळे येथे अभाविपच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महापौर सौ.भारती सोनवणे यांनी काळी फित लावून गुरुवारी कामकाज पाहिले. महापौर म्हणाल्या की, विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. कोरोनामुळे गेल्या ५ महिन्यापासून विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यातच कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती देखील नाजूक आहे.

आपल्या मागण्या शासनाकडे पोहचविण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न हा त्यांचा हक्क होता. अभाविपच्या माध्यमातून ते आपल्या मागण्या मांडणार होते परंतु पोलिसांनी त्यांना पकडून एखाद्या गुंडाप्रमाणे मारहाण केली. प्रशासनाच्या नजरेत कदाचित आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे चुकले देखील असेल परंतु त्यांना पोलिसांनी केलेली अमानुष मारहाण देखील योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करून धुळ्यात झालेल्या सर्व प्रकाराचा मी निषेध करते, असे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.

Protected Content