आयशर ट्रक चोरट्यांनी लांबविला

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरुण परिसरातील सारा हॉस्पिटलजवळून आयशर ट्रक लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मेहरुण परिसरातील रामनगरात जावीद लतिफ पटेल हा तरुण वास्व्यास असून त्याच्याकडे (एमएच १९ सीवाय ४८४६) क्रमांकाचा आयशर ट्रक आहे. हा ट्रक चालवून तो कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. दि. ८ रोजी रात्री ११ वाजता नाशिकहून आल्यानंतर त्यांनी आपला ट्रक सारा हॉस्पिटलच्या मुख्य रस्त्यावर लावला होता. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी लांबवून नेला. सकाळी जावीद यांचे वडील दूध घेण्यासाठी गेले असता, त्यांना आपल्या मुलाचा ट्रक याठिकाणी दिसून आला नाही. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रकबाबत आजूबाजूच्यांकडे विचारपूस केली. मात्र त्यांना कुठलीही माहिती मिळून आली नाही. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ अतुल वंजारी करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content