मुसळधार पावसामुळे झाड कोसळल्याने वाहनाचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या ओमकारनगरात झाड कोसळल्याने एका चार चाकी वाहनाचे नुकसान झाले आहे.

रविवारी ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाला. यावेळी शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी झाली होती. तर नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या ओमकार नगरातील के.के. हॉस्पिटल समोर आलेले मोठे झाड कोसळले आहे. या मध्ये एका चार चाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. मोठे झाड कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. जळगाव महानगरपालिकेच्या वतीने पडलेले झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले होते.

Protected Content