पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौकातील बाफना शोरून समोरून एका तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत रविवारी ११ सप्टेंबर रेाजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैभव हरीदास निंबाळकर (वय-२४) रा. कानळदा रोड, शिवाजी नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार ६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वैभव निंबाळकर हा (एमएच १९ सीएस ४०७१) क्रमांकाची दुचाकी घेवून अजिंठा चौकातील बाफना कंपनीच्या समोर आला होता. त्यावेळी दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. वैभवने सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला परंतू त्याला दुचाकी कुठेही मिळाली नाही.पाच दिवसानंतर रविवारी ११ सप्टेबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.

Protected Content