भाजपच्या खासदारांमुळे जळगाव मतदार संघाचा विकास खुंटला – गुलाबराव देवकर ( व्हिडीओ )

Gulabrao devkar

जळगाव प्रतिनिधी । गेल्या वीस वर्षांपासून भाजपाचा खासदार जळगाव मतदार संघात निवडून येतो मात्र जळगाव शहरासह मतदार संघातील तालुक्यांमध्ये ठोस असे विकास कामे नाही. गेल्या पंचवार्षीक निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांचे पाळले नाही. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

मोदी सरकारवर सोडले टिकास्त्र
गेल्या 20 वर्षापासून जळगाव मतदार संघात भाजपाचे खासदार निवडून येतात. परंतू एकाही विकासाचे ठोस काम भाजपाच्या खासदारांकडून झालेले नाही. जळगाव शहरासह तालुक्याचा विकासाचे काम थांबलेले आहे. गेल्या पंचवार्षीक निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांचे पाळले नाही. शेतकरी उत्पन्नास हमी भाव, गरीबी, रोजगार उपलब्ध झालेले नाही, तसेच ग्रामीण भागासह सर्व नागरीकांमध्ये भाजपाच्या कामांमुळे नाराजी व्यक्त होत आहे. 2009 ते 2014 पर्यंत आमदार आणि माजी मंत्री असतांना जळगाव मतदार संघात विकास कामे करण्याचा प्रयत्न केला असून आता लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी मिळाली असून आता मिळालेल्या संधीचे सोने करायचे आहे. जळगाव मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असल्याने जळगाव मतदार संघात खासदार म्हणून मोठ्या मतधिक्क्याने निवडणून येईल अशी प्रतिक्रिया लाईव्ह ट्रेंडशी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी दिली.

जी.एस. मैदानावर सभा
सकाळी शहरातील जी.एस. मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील मातब्बल नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर, भव्य रॅली काढून गुलाबराव देवकर यांनी आपला अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील, अरूणभाई गुजराथी, आमदार डॉ. सतीश पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीपभैय्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पहा । गुलाबराव देवकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया

Add Comment

Protected Content