Home क्राईम अश्लिल हावभाव करत दोघांकडून महिलेचा विनयभंग !

अश्लिल हावभाव करत दोघांकडून महिलेचा विनयभंग !

0
109


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेचा दोन विधीसंघर्षीत मुलांनी अश्लिल हावभाव करत हात पकडून विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात विधी संघर्ष बालका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, सुप्रीम कॉलनी परिसरातील एका भागात २३ वर्षीय महिला आहे. आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता महिला ही घरी असताना त्याच भागात राहणारे दोन अल्पवयीन असलेल्या मुलांनी त्यांच्याकडून पाहून अश्लिल हावभाव केले. तसेच एकाने महिलेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत त्यांचा विनयभंग केला. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार विधीसंघर्षित असलेल्या दोन मुलांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound