आता रक्षाताई खडसे यांच्या फोटोवरून धमासान

 

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयातील निखील खडसे यांची प्रतिमा काढल्या वरुन झालेला वाद मिटत नाही तोच आता खासदार रक्षाताई खडसे यांना आगामी आंदोलनाच्या बॅनरवर स्थान नसल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नाथ फाऊंडेशनच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.  यामुळे रक्षाताई यांना पुन्हा एकदा बॅनर स्थान देण्यात आले असले तरी भाजपमधील अंतर्विरोध समोर आल्याचे दिसून येत आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी आता यानंतर भाजपमध्ये त्यांच्याबाबत नेमके कसे वागावे याबाबत संभ्रम वाढीस लागला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयातून एकनाथराव खडसे यांची प्रतिमा काढण्यात आली मात्र यासोबत त्यांचे पुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य निखील खडसे यांची प्रतिमा देखील काढण्यात आल्यामुळे नाथ फाउंडेशनचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. निखिल खडसे हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य असून त्यांच्या पत्नी या भाजपच्या खासदार असतानाही प्रतिमा काढण्यात आल्यामुळे नाथ फाउंडेशन नाराजी व्यक्त केली होती यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या ९ नोव्हेंबर रोजीच्या नियोजित आंदोलनासाठी तयार करण्यात आलेल्या एका बॅनरवर रक्षाताई खडसे यांना स्थान नसल्याचे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून आले. याबाबत सोशल मीडियामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. यानंतर काही वेळातच याच बॅनरवर रक्षाताई खडसे यांचा फोटो असल्याचे दिसून आले पाचोरा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी हे बॅनर सोशल मीडियामध्ये प्रसारित केले होते. दरम्यान, यामुळे आता पुन्हा एकदा प्रतिमांचा खेळ आणि यावरून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत विरोध दिसून येत आहे.

Protected Content