दुचाकीवरुन दारुची तस्करी करणाऱ्यास अटक

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीवरुन बेकायदेशीरपणे देशी दारुची तस्करी करणाऱ्या एकास एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली.

सचिन अशोक तमायचेकर (वय ४०, रा. जाखनीनगर, कंजरवाडा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. घटना अशी की, तमायचेकर हा दुचाकीवरुन देशी दारुची वाहतूक करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी दुपारी पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी यांच्या पथकाने सिंधी कॉलनी रस्त्यावर तमायचेकर याची दुचाकी अडवली. या दुचाकीच्या डिक्कीत तसेच एका पिशवीत दोन हजार ४९६ रुपयांची देशी दारु आढळुन आली. पोलिसांनी दारुसह तमायचेकर याची दुचाकी देखील जप्त केली आहे. तमायचेकर याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content