लग्नानंतर मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ

जळगाव प्रतिनिधी ।  तालुक्यातील मन्यारखेडा येथील सासर व जळगाव शहरातील वाटीका आश्रम परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेचा लग्नानंतर मुलगी झाली तसेच माहेरुन दोन लाख रुपये आणावेत यासाठी छळ केला जात असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील वाटीका आश्रम श्रावण पार्क परिसरातील श्रध्दा महेंद्र पाटील वय २० यांचा मन्यारखेडा येथील महेंद्र भिमसिंग पाटील यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर श्रध्दा पाटील यांना मुलगी झाली. मुलगी झाल्याच्या कारणावरुन पतीसह सासरच्यांनी छळ करण्यास सुरुवात केली. यानंतर श्रध्दा पाटील हिने माहेरुन २ लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. श्रध्दा यांनी पैसे आणले नाही म्हणनू तिला शिवीगाळ करत मारहाण केली. व पैसे आणले नाही तर तुला नांदवणार नाही अशी धमकी दिली. अशाप्रकारे विवाहितेचा शारीरिक तसेच मानसिक छळ केला. अशा आशयाच्या श्रध्दा पाटील यांच्या फिर्यादीवरुन पती महेंद्र भिमसिंग पाटील, सासरे भिमसिंग दाजीबा पाटील सासू सकुबाई भिमसिंग पाटील, नणंद जनाबाई जितेंद्र पाटील, दीर राजेंद्र भिमसिंग पाटील, शितल राजेंद्र पाटील सर्व रा. मन्यारखेडा, पाटीलवाडा याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहेत.

 

Protected Content