जळगावात दोन अट्टल गुन्हेगारांना अटक

जळगाव प्रतिनिधी । अहमदाबाद, राजस्थान, आंध्रप्रदेश व तामिळनाडू या राज्यातील बॅग लिप्टींग करणारी टोळी जळगावात आल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना मिळाली. त्यानुसार शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती. शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना शुक्रवारी पहाटे गस्तीदरम्यान शेख जमीर शेख सईद मन्यार वय 19, शेख अर्षद शेख हनिफ वय 20 दोघे रा. अडावद ता.चोपडा दोन सराईत चोरटे गसवले असून दोघांकडून चोरीच्या दोन दुचाकी व दोन मोबाईल असा एकूण 55 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी बिनतारी संदेशव्दारे जळगाव शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त वाढविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अरुण निमक यांनी शहर पोलीस कर्मचारयांची चार पथक तयार केले होते. व सर्वांना सतर्क गस्त घातण्याच्या सुचना केल्या होत्या.

गस्तीदरम्यान दोघांना सापळा रचून अटक
शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील गणेश शिरसाळे, सुधीर साळवे, प्रणेश ठाकूर, सचिन वाघ, तेजस मराठे, योगेश इंधाटे, रतन गीते हे शुक्रवारी पहाटे नवीपेठ परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान पथकाला दोन संशयित दिसले. पथकाने महावीर आईसक्रिमजवळ सापळा रचून शेख जमीर व शेख हनिफ या दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी चोपडा येथे महामार्ग व सावदा शहरातील भाजीपाला मार्केट अशा दोन ठिकाणांहून चोरलेल्या दोन दुचाकी तसेच दोन मोबाईल असा एकूण 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांना पुढील कारवाईसाठी सावदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content