भाषेशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही ; प्रा. डॉ. मोरे (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 08 18 at 3.52.02 PM

जळगाव प्रतिनिधी | साहित्य भाषेमधून लिहिले जाते. भाषा ही मानवाची निर्मिती आहे. भाषेचे अनेक व्यवहार होतात त्यातला साहित्य हा एक व्यवहार आहे. भाषा आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात प्रवेश करते. भाषेशिवाय आपण पुढे जाऊ शकत नसल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

ते सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री दलिचंद जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित १ दिवसीय १५ वे राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रख्यात लेखक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. खान्देशातील नामवंत इतिहासाचे अभ्यासक डॉ. नरसिंह परदेशी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. खान्देशातील नामवंत कथा कादंबरीकार प्रा. डॉ. संजीव गिरासे  हे समारोपीय सत्राच्या अध्यक्षपदी राहतील. यावेळी व्यासपीठवर प्रमुख पाहुणे म्हणून महाकवी सुधाकर गायधनी, सेवादास दलिचंद जैन, सतीश जैन हे उपस्थित होते.प्रा. डॉ. मोरे पुढे म्हणाले की, भाषा निर्माण करण्याची बोलण्याची क्षमता प्रत्येक माणसात आहे. भारतात असलेले भाषिक वैविध्य जगातील कोणत्याही देशात नाही. मराठी भाषेची उत्क्रांती झालेली आहे ती भाषा दोन अडीच हजार पूर्वीची असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. प्राकृत कवींनी लिहिल्या कवितांचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्यात आले होते असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, महाकवी सुधाकर गायधनी यांनी आपली लेखणी सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांना सन्मानपूर्वक दिली. संमेलनाच्या कालावधीसाठी केशव तिवारी सभागृह, डॉ. उल्हास कडूसकर व्यासपीठ, प्रा यशवंत पाठकनगर, दिवाकर चौधरी प्रवेशद्वार अशी नावे देण्यात आली आहेत. पहिल्या सत्रात ९ व्या वर्षाचा अखिल भारतीय श्री. दलुभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार महाकवी नागपूरचे सुधाकर गायधनी यांना प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. सदानंद मोरे यांना श्री दलुभाऊ जैन चॅरीटेबल ट्रस्ट प्रायोजित ३ वर्षाचा अखिल भरतीय पद्मश्री भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्व. प्रा. पन्नालाल भंडारी; स्व. सौ. बदामबाई
हेमराज देसर्डा यांच्या स्मरणार्थ १६ व्या वर्षाचा सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार – डॉ. गिरीश जाखोटीया, श्री दलुभाऊ जैन चारीटेबल ट्रस्ट प्रायोजित व स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ १३ व्या वर्षाचा सूर्योदय सेवा पुरस्कार – भगवान भटकर, श्री दलुभाऊ जैन चॅरीटेबल ट्रस्ट प्रायोजित स्व.बन्सीलाल -शिवराज जैन, स्व. कांतीलाल हिरालाल चौरडीया यांच्या स्मरणार्थ २ वर्षाचा सूर्योदय साहित्य भूषण पुरस्कार – अशोक सोनवणे, ४ थ्या वर्षांचा सौ. लीलाबाई दलीचंद जैन सूर्योदय बाल साहित्य पुरस्कार- किशोर पाठक, स्व. गोकुळचंद्र लाहोटी यांच्या स्मरणार्थ ५ वर्षाचा सूर्योदय सेवाव्रती पुरस्कार – पाडुरंग सुतार, २ रा सूर्योदय शब्दरत्न पुरस्कार – रमेश लाहोटी, १६ व्या वर्षाचा सूर्योदय सेवारत्न पुरस्कार – सावळीराम तिदमे, श्री दलुभाऊ जैन चॅरीटेबल ट्रस्ट प्रायोजित ३ रा सूर्योदय काव्य पुरस्कार – नामदेव कोळी यांना देण्यात आला. प्रास्तविक सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे उपाध्यक्ष  प्रवीण लोहार यांनी  तर सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.

Protected Content