यावल-चोपडा राज्यमार्गावर खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाला निवेदन

यावल प्रतिनिधी । चोपडा ते यावल मार्गावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याची दखल न घेतल्यास रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षलागवड करण्याचा इशारा भाजपातर्फे देण्यात आला आहे.

दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, यावल शहरातून जाणाऱ्या चोपडा ते यावल या मार्गावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहे. या खड्ड्यांमुळे वाहतुकीची फार मोठी डोकेदुखी झाली आहे. वाहनाच्या दबावामुळे टायराखाली येणारे दगड उडून अनेकांना दुखापतीना सामोरे जावे लागत आहे. यावल शहरातील प्रमुख बुरूज चौकात देखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दरम्यान बांधकाम विभागाने त्वरीत दखल न घेतल्यास २६ जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे , योगेश चौधरी, रितेश बारी, परेश बारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content