चाळीसगावात रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । महामार्ग पोलिस केंद्र चाळीसगावच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतगर्त १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान विविध उपक्रमातून वाहनधारकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पोलिस उपअधीक्षक कैलास गावठे यांनी केले.

महामार्ग क्रमांक- २११ वर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. खड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डे असा भयावह चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्यामुळे यावर आवर घालण्यासाठी व वाहनधारकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महामार्ग पोलिस केंद्र चाळीसगावच्या वतीने १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी पर्यंत हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालवताना फोनवर बोलू नये, रक्तदान शिबीर आयोजित करणे तसेच अनेक उपक्रम या एक महिन्यात राबविण्यात येणार आहे अशी माहिती महामार्ग पोलिस उपनिरीक्षक भागवत पाटील यांनी दिली. दरम्यान यावेळी पोलीस उपअधीक्षक कैलास गावठे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर व पोलीस उपनिरीक्षक भागवत पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content