‘निजामी बंधू सुफी नाईट’ कार्यक्रमाचे ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’वर थेट प्रक्षेपण !

68428689 2907764925932549 1512965013847932928 n

 

जळगाव प्रतिनिधी । लोकमत व आनंदयात्री क्लब आयोजित पी.पी.आर.एल.मेरा घर प्रस्तुत ‘निजामी बंधू सुफी नाईट’ या कार्यक्रमाचे ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’वर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. १९ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ७.३० वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होत आहे.

 

निजामी बंधू सुफी नाईट’मध्ये उस्ताद चंद निजामी, शादाब फरीदी आणि साहेराब फरीदी निजामी उपस्थित राहणार आहेत. अमीर खुसरोद्वारा निजामुद्दीन औलिया यांच्यासमोर लिखित रचनांचे सादरीकरण निजामी बंधू करणार आहेत. निजामी बंधूचे रॉकस्टार चित्रपटातील ‘कुन फायकुन’ आणि बजरंगी भाईजानमधील ‘आज रंग है रे मे’ ही प्रसिद्ध गीतं गायली आहेत. दरम्यान, निजामी बंधू ‘सुफी नाईट’ हा कार्यक्रम – निमंत्रितांसाठी असल्यामुळे ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’खास आपल्या वाचकांसाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करणार आहे.

Protected Content