किनगाव परिसरात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा थांबवा; हिंदवी स्वराज्य सेनेची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथे गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसा व रात्री वेळी महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा थांबवा अशी मागणी ग्रामस्थांसह हिंदवी स्वराज्य सेनेने केली आहे.

दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, तालुक्यातीत किनगाव व परिसरात  मागील काही दिवसांपासून वारंवार अचानक विजपुरवठा खंडीत होत आहे.  रात्री एक वाजेच्या सुमारास देखील विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरीकांसह शेतकरी हैराण झाले आहे. सध्या वातावरणात झालेल्या बदलामुळे साथीचे आजारही डोकेवर काढत आहेत. या परीसरात मागील काही दिवसांपासुन चोरट्यांचाही कहर आहे. मात्र महावितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणीचे निवेदन किनगाव ग्रामस्थांसह हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने विजवितरण कंपनी कार्यालयातील अभियंता पंकज कांबळे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी   हिंदवी स्वराज्य सेनेचे जिल्हा प्रवक्ता समाधान पाटील, राहुल पाटील, मोहन पाटील, दिपक सावंदे, पंकज हिवराळे, समाधान महाजन, रहिम तडवी, निलेश महाजन, गोपाळ धनगर, करमचंद पाटील, लक्ष्मण पाटील, गजानन धोबी, विश्वास सुरवाडे, वसंत सोनार, प्रकाश सोनार, चेतन जोशी, निलेश पाटील, सुरेश सोनार, प्रभाकर तायडे, गजानन चौधरी, सुनिल महाजन, विलास पाटील, लिलाधर हिवराळे, विलास पाटील, सचिन पाटील, शे.फारूख शे.अशरफ, अनिल पाटील, समीर तडवी, धनराज चौधरी, रविंन्द्र सोनार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content