जैन इरिगेशनमध्ये जलसाक्षरता शिबीर संपन्न

जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क येथे ‘जलसाक्षरता शिबीर’ संपन्न झाले.

शिबिराचे प्रमुख वक्ते आरिफ शेख, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश जळगाव हे उपस्थित होते. त्यांचे स्वागत जैन इरिगेशन सिस्टिम्सचे मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष व्ही. एम. भट यांनी केले. जलसंधारण शिबिराची  प्रस्तावना जैन इरिगेशनच्या कार्मिक विभागाचे उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक यांनी मांडली.

याप्रसंगी ‘जैन इरिगेशन कंपनी पाणी बचत, संवर्धनासाठी काम करणारी कंपनी असून त्यांच्या पाणी बचत कार्याप्रमाणे सध्य परिस्थितीत जलसंधारण व पर्यावरण रक्षणाची गरज असल्याचे’ प्रतिपादन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे आरिफ शेख यांनी केले.

जलसंधारणात जैन इरिगेशनचे योगदान या विषयावर बोलतांना आरिफ शेख यांनी सांगितले की, “गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गावे दत्तक घेऊन तेथील लोकांना पाणी बचतीचे महत्व सांगून जलसंधारणाचे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यातूनच समाजामध्ये पाण्याविषयी जागरूकता निर्माण केली जात आहे. जिल्हा विधी व न्याय विभागाचे काय काम असते ? ते कशा पद्धतीने चालते ? व जनतेच्या अडचणी कशाप्रकारे सोडविल्या जातात याबाबत आरिफ शेख यांनी माहिती दिली. आभार प्रदर्शन चंद्रकांत नाईक यांनी केले.

Protected Content