आता ईडी गावागावात पोहचलीय : शरद पवारांची टीका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आधी ईडी म्हणजे काय कुणालाही माहित नसतांना आता ईडी गावागावात पोहचल्याचे सांगत याचा गैरवापर करण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावरून भाजप नेत्यांनी मविआवर टीका केली असतांना शरद पवार यांनी पलटवार केला आहे.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना शरद पवार म्हणाले की, ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशातील सर्वात मोठा प्रश्न बनलाय. आपण जी आकडेवारी दिली ती आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छपणे सांगते की राजकीय किंवा अन्य हेतुनं कुणालातरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. खरं सांगायचं म्हणजे गेल्या ५ ६ वर्षात ही ईडी नावाची संस्था इथं बसलेल्या कुणाला माहिती नव्हती. मात्र आता ही ईडी गावागावात पोहोचलीय. या सगळ्या गोष्टीचा गैरवापर दुर्दैवानं सुरु आहे. बघू आता त्याला काही पर्याय निघतो का’, असे पवार म्हणाले.

ईडीच्या आजच्या छाप्यांमध्ये ठाण्यातल्या निलांबरी प्रोजेक्टमधल्या ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या सदनिकांची एकूण किंमत ६ कोटी ४५ लाख रुपये इतके असल्याची माहिती मिळाली आहे.

Protected Content